Pune : 50 लाख रुपयांचे बजेट रोखल्याने नगरसेवक राजाभाऊ बराटे यांचा संताप

एमपीसी न्यूज – कर्वेनगर भागात सीसीटीव्ही बसविण्याचे 50 लाख रुपयांचे बजेट प्रशासनाने रोखल्याने भाजपचे नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी संताप व्यक्त केला. आपल्या भागात वैद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. नेमके त्याच योजनेचे पैसे अडविण्यात आले. आपण कोणत्याही अधिकाऱ्याला अपशब्द वापरले नसल्याचे राजाभाऊ बराटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होती. त्या बैठकीत बजेट रोखल्याने राजाभाऊ बराटे यांनी नाराजी व्यक्त केली. अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांना विचारणा केली. त्यावेळी बाचाबाची होऊन अधिकाऱ्यांनी सभात्याग केला. त्यानंतर महापालिका आयुक्त सभेला उपस्थित होते.

स्थायी समितीच्या बैठकीबाबत काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. आज जो विषय झाला तो राजाभाऊ बराटे आणि शंतनू गोयल यांनी मिटविला आहे. हा वाद आणखी उगीचच वाढवू नका, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. तर, अशा प्रकारचा काही वादच झाला नसल्याचे स्थायी समिती सदस्य वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, दीपक पोटे यांचं म्हणणं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.