Pune : नगरसेवक, अ‍ॅड. प्रसन्नदादा जगताप मित्र परिवारातर्फे गरजूंना फूड पाकीटे विनामूल्य देणार

0

एमपीसी न्यूज – नगरसेवक, अ‍ॅड. प्रसन्नदादा जगताप मित्र परिवारातर्फे एक सकारात्मक पाऊल गरजेच्या दिशेने उचलण्यात येणार आहे. अँड. प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक, सिंहरोड परिसर, पुणे यांचे मित्रपरिवारातर्फे सिंहगड रोडवर गरजूंना विनामूल्य फूड पाकीटे देण्याचा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पुण्यात सिंहगड रोडवर शिक्षणासाठी जे विद्यार्थी आले आहेत. ज्यांची खानावळ (मेस) बंद आहे. त्यांचे जेवणाचे खूप प्राँब्लेम तयार झाले आहेत. तसेच अनेक गरीब कष्टकरी की त्यांना हॉटेल्स बंद असल्याने जेवण मिळायला अडचणी होत आहेत, अशा सर्वांसाठी संचारबंदी काळात रोज सकाळी – संध्याकाळ फूड पाकीटे विनामूल्य उपलब्ध करुन देत आहोत.

हे आहे अत्यंत महत्वाचे
पण, यासाठी नावनोंदणीची गरज आहे. जे नावनोंद लवकरात लवकर करतील ( शेवटची तारीख २८ मार्च ) त्यांचेसाठीच ही सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. नावनोंद खालील दिलेल्या क्रमांकावर करण्यात यावी. जेणेकरून फूड पाकीटे बनवून त्याप्रमाणे वाटप करणे सोयीस्कर होईल.  नावनोंदणी झाल्यावर कधीपासून व कोठे वाटप सुरू होईल, हे कळविण्यात येईल.

येथे संपर्क साधा :
अजय भानोसे ८९८३०७९२१०
रवींद्र चौधरी ९९२३०८१८१८
अश्विनी गोरे ९८२३७९८३५७
राहुल रुपदे ९७६५२७७५९९
अ‍ॅड. प्रसन्नदादा जगताप ९८२२०२२९५०

HB_POST_END_FTR-A2
You might also like