Pune : नगरसेवक गोरगरीब नागरिकांना देताहेत अन्नधान्य

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. हातावरच पोट असणाऱ्या अनेक गोरगरीब नागरिकांना आता घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे महापालिकेचे सर्वोपक्षीय नगरसेवक मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, साखर, मसाला, किराणा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

सध्या जेष्ठ नागरिकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांना लागणाऱ्या केअर टेकरलाही प्रवेश दिला जात नाही. त्यांना ओळखपत्र देऊन काम करू देण्याची मागणी करण्यात येत आहे.

पुणे शहरात झोपडपट्टी भागांत जवळपास 50 टक्के नागरिक राहतात. या गोरगरीब नागरिकांसाठी मोफत अन्नधान्य महत्वपूर्ण ठरत आहे. काही सामाजिक संघटनांनी मोफत जेवणाचे डबेही पुरवायला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.