Pune : बनावट चलनी नोटा बाळगणारी टोळी जेरबंद

Counterfeit currency gang arrested पुणे पोलीस गुन्हे शाखा आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – बनावट चलनी नोटा बाळगणारी सहा जणांची टोळी जेरबंद करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहे.  पुणे गुन्हे शाखेने लष्करी गुप्तचर यंत्रणेबरोबर पुण्यात ही संयुक्त कारवाई केली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका लष्करी जवानाचाही समावेश आहे.

बनावट चलनी नोटांच्या संदर्भात लष्करी गुप्तचर यंत्रणेमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे  पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना कारवाई संदर्भात नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार  गुन्हे शाखा पुणे यांच्या वतीने लष्करी गुप्तचर टीमबरोबर नियोजन करून आज (बुधवारी) एक संयुक्त ऑपरेशन राबविण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या ऑपरेशनमध्ये बनावट भारतीय आणि विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी  6 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका  लष्करी जवानाचा देखील समावेश आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बनावट चलनी नोटांची अजून मोजणी सुरू आहे. या संयुक्त ऑपरेशनसाठी युनिट 4 आणि एएनसी पश्चिमच्या पोलिसांनी लष्करी गुप्तचर टीमबरोबर समन्वय साधत ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, या बनावट चलनी नोटा कोठून आल्या यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.