Pune : आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर, न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असून तेलतुंबडे यांची सुटका करावी
असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी पोलिसाना दिला. या प्रकरणी न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले आहे.

एल्गार परिषद प्रकरणी कॉम्रेड आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल पुणे न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे आनंद तेलतुंबडे यांना केव्हाही अटक होऊ शकते असे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई येथून आज पहाटे तेलतुंबडे यांना अटक करून पुणे न्यायालयात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हजर केले.

यावेळी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आणि बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी बाजू मंडळी. बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असून त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले.

प्रकाश आंबेडकर न्यायालयात उपस्थित

एल्गार परिषद प्रकरणी कॉम्रेड आनंद तेलतुंबडे यांना आज दुपारी तीन वाजता पुणे न्यायालयात हजर केला असता. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील सुनावणी दरम्यान उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.