Pune : कोवीड तपासणी होणार जलदगतीने; डायना फिल्टर्स कंपनीकडून कोविड सॅम्पल कलेक्शन बूथची निर्मिती

एमपीसी न्यूज – सध्या वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्णांची कोवीड सॅम्पल तपासणी जलदगतीने होण्यासाठी डायना फिल्टर्स या कंपनीने कोविड सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसीत केले असून ते ससून हॉस्पीटलमध्ये कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या नाविण्यपूर्ण उपकरणाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली.

पाहणी करताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी यामध्ये काही सुधारणा सुचविल्या. हे उपकरण निश्चितच उपयोगी राहील, अशी प्रतिक्रिया विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहेच. त्याचसोबत प्रशासनाने टेस्ट जास्तीत जास्त वाढवणे गरजेचे आहे. ही तपासणी वेगाने करण्यासाठी डायना फिल्टर्स ही कंपनी पुढे आली आहे. कोरोनाचे सॅम्पल कलेक्शन बूथ कंपनीकडून तयार करण्यात आले आहे. ते विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्यासमोर सादर करण्यात आले. उपकरणाचे कौतुक करत त्यात काही बदल सुचविण्यात आले असून हे उपकरण उपयोगात आल्यास मोठी मदत होणार आहे.

 

या उपकरणामुळे पीपीई किटसचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सॅम्पल टेस्टींग घेता येतील. अभिजीत येमुल : व्यवस्थापकीय संचालक, डायना फिल्टर्स.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1