Pune : क्रेडाई, पुणे मेट्रोच्या ‘मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल’ला सुरूवात; प्रदर्शन रविवारपर्यंत खुले राहणार

ग्राहकांना घर निवडीसाठी मदत करणा-या खास पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – क्रेडाई, पुणे मेट्रोतर्फे आयोजित केलेल्या एकोणीसाव्या ‘मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल’ या गृहप्रदर्शनाचे शुक्रवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) प्रमुख कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रेंज हिल्स येथील सिंचननगरमध्ये असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरविण्यात आलेले हे प्रदर्शन रविवार (दि. 8 डिसेंबर)पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात खुले राहणार आहे.

यावेळी  ग्राहकांना घराची निवड करणे आणखी सोपे जावे, यासाठी ‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे ‘गाईडलाईन्स फॉर द होम बायर्स’ ही खास पुस्तिका प्रकाशित केली असून त्याचेही अनावरण करण्यात आले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे अध्यक्ष सुहास मर्चंट, ‘मेगा प्रॉपर्टी फेस्टिव्हल’च्या प्रदर्शन समितीचे प्रमुख अरविंद जैन, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष मनीष जैन, अनिल फरांदे, सचिव आदित्य जावडेकर, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य सचिन कुलकर्णी, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे महाव्यवस्थापक बलदेव प्रकाश, आयसीआयसीआय’च्या मॉर्गेजेस-सेल्स विभागाचे प्रमुख जसमिंदर सिंग चहल, ‘एचडीएफसी’च्या वसिष्ठ महाव्यवस्थापक सोनल मोदी, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का आदी उपस्थित होते.

प्रदर्शनास भेट देणा-या ग्राहकांना सदनिका निवडीसाठी मदत करणारी माहिती पुस्तिका मोफत देण्यात येणार आहे. सुहास मर्चंट म्हणाले, ‘‘ग्राहकांना महारेरा कायद्याबद्दल ब-याच शंका असतात. त्यांचे निरसन या पुस्तिकेद्वारे होऊ शकेल. रेरा नोंदणीकृतच सदनिका घेण्यामुळे होणारे फायदे, ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांना एका मंचावर आणून त्यांच्यातील वाद सोडविणारे ‘रेरा रीकन्सिलिएशन फोरम’ या सर्व गोष्टींची माहिती आम्ही या पुस्तिकेत संकलित केली आहे.’’

यावेळी श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘बांधकाम क्षेत्राची स्थिती बदलत असून परवणारी घरे आणि ‘सेमी-लग्झरी’ घरे उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामुळे घरासाठीचे विविध पर्याय पारखून बघण्यासाठीची ही संधी आहे.’’

यावेळी विक्रम कुमार म्हणाले, ‘‘प्रदर्शनात सहभागी झालेल्या गृहप्रकल्पांविषयी विस्तृत माहिती ग्राहकांना घेता येणार असून ग्राहकांसाठी माहितीपुस्तिका प्रकाशित करण्याचा क्रेडाईचा उपक्रमही स्तुत्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.