Pune : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील अखेर सापडले

एमपीसी न्यूज : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव (Pune) याचे वडील सोमवारी (27 जानेवारी) सकाळपासून हरवले होते. त्यांचे नाव महादेव जाधव. अखेर मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घोरपडीतील जयहिंद चौकात ते सापडले. 

 

पुण्यातील कोथरूड भागातून ते सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले; ते घरी परतलेच नव्हते. सिटी प्राईड कोथरूड येथून त्यांनी रिक्षा पकडल्याचे सर्वांना ठाऊक होते. पण, पुढे ते कुठे गेले? याची माहिती कोणालाच नव्हती. शिवाय त्यांचा फोनही बंद होता.

त्यामुळे केदार याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार (Pune) पोलिसांची पाच पथके तत्काळ शोधकार्यास रवाना झाली. अखेर त्याचे वडील जय हिंद चौकात सापडले.

Today’s Horoscope 28 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.