Pune Crime : परदेशात नाेकरीच्या बहाण्याने 12 लाख लुबाडले

एमपीसी न्यूज – पुण्यातील सॅलिसबरी पार्क येथे राहणाऱ्या 60 वर्षीय इसमाला परदेशात नाेकरी लावून देण्याच्या अमिषाने अनाेळखी इसमाने ऑनलाईन संपर्क साधत, 12 लाख 77 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी हरदीपसिंग बिंद्रा यांनी स्वारगेट पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविराेधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरदीपसिंग बिंद्रा हे ऑनलाईन नाेकरीच्या शाेधत असताना, त्यांना एका अनाेळखी इसमाने ईमेलद्वारे संपर्क करुन दुबई येथील हाॅस्पिटलच्या नावाने खाेटे इमेल आयडी व लेटरहेड तयार करुन, त्याठिकाणी नाेकरीस लावताे असे अमिष दाखवले. बिंद्रा यांच्याशी वेळाेवेळी संपर्क करुन त्यांचा विश्वास संपादन करुन बिंद्रा यांचेकडून दुबईला जाण्यासाठी व राहण्यासाठीचा खर्च म्हणून 12 लाख 77 हजार 992 रुपये बॅंक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून, त्यांना नाेकरीला न लावता त्यांची फसवणुक केली आहे. स्वारगेट पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी हे याबाबत पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.