Pune Crime : खाऊच्या आमिषाने 7 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग; 50 वर्षीय आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. सात वर्षीय चिमुरडीला खाऊ देण्याच्या आमिषाने एका 50 वर्षीय नराधमाने तिचा विनयभंग केला.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी तक्रार दिली असून आरोपी जॉन सायमन डिसुझा याला कोंढवा पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंबियासह कोंढवा परिसरात राहायला आहे. त्यांच्या शेजारील इमारतीच्या पार्किंगमध्ये जॉन राहायला आहे. तो साफसफाईची कामे करतो. दोन दिवसांपुर्वी 7 वर्षीय मुलगी इमारत परिसरात असताना जॉनने तिला खाउचे आमिष दाखवित बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मुलीचा विनयभंग केला.

घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित चिमुरडीला त्याने मारहाण करण्याची धमकी दिली. काही दिवसांपुर्वी नवी पेठेत 7 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा कोंढव्यात असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.