Pune News : मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या साठ वर्षीय महिलेला अटक

एमपीसी न्यूज – मॅफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची विक्री करणा-या साठ वर्षीय महिलेला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. कॅम्प परिसरात मंगळवारी (दि.10) हि कारवाई करण्यात आली.

अटक केलेल्या महिले कडून 1 लाख 30 हजार किंमतीचे मॅफेड्रॉन व 1 लाख 40 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. नसरिन अब्दुलरब कुरेशी (वय 60, रा. लष्कर कॅम्प, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक लष्कर कॅम्प भागात पेट्रोलींग फिरत असताना अटक महिला कॅम्प परिसरातील न्यु मोदीखाना येथील बोळात संशयितरित्या थांबली होती. पथकाने तिला ताब्यात घेऊन झडती घेतली असता तिच्याजवळ 1 लाख 30 हजार किंमतीचे मॅफेड्रॉन व 1 लाख 40 हजार रोख रक्कम आढळली. तिच्या जवळील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एनडीपीएस अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.