Pune Crime : जमीन बळकावल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : कोळेवाडी (Pune) येथील दोन एकर जमिनीचे एकत्रीकरण करून आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरून बोगस व्यक्ती तयार करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन जाचक, प्रशांत गावडे, पंकज भूमकर, संतोष शेट्टी, शैलेश लांडे, विशाल कांबळे व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबत अत्तार गुलाम हुसेन (वय 75, रा. सेंट्रल पार्क सोसायटी, वेलेस्ली रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारदाराने ही जमीन 1986 मध्ये खरेदी केली (Pune) होती. ही जमीन 17 जून 2022 रोजी बळकावण्यात आली होती. त्याचा बनावट पासपोर्ट फोटो जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उपनिबंधक कार्यालयात काढण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती – राज्यपाल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.