Pune Crime : किरकोळ वादातून महिलेकडून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : एका महिलेने किरकोळ वादातून पीएमपीएमएल बस चालकाला बेदम मारहाण (Pune Crime) केल्याची घटना घडली. ही महिला माजी भाजप नगरसेविका असल्याचा दावा या बस चालकाने केला आहे. स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या चालक शशांक देशमाने यांच्यासोबत अभिनव चौकात दुपारी हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्वारगेट डेपोतील पीएमपीएमएल बसचे चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र. 2 वर  अभिनव कॉलेज चौकात बस व कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात कार चालक महिला आणि बस चालक यांच्यामध्ये किरकोळ वाद झाले. त्या वादातून महिलेने इतर 3 साथीदारांसह चालक देशमाने यांना जबर मारहाण केली.

ज्या चारचाकी गाडीचा अपघात झाला होता, ते व त्यांच्या बरोबर कारमधील इसम हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत, असा दावा देशमाने यांनी केला आहे.

देशमाने यांना जखमी अवस्थेत ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलीस (Pune Crime) प्रशासनाने या बाबत कडक भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका पीएमपीएमएल चालकांनी एकत्र मांडली आहे.

Baramati News : गाईचा गोठा साफ करणे पडले महागात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.