Pune Crime : लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांची कोयत्याने हाणामारी

खडक पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लहान मुलांच्या भांडणातून मोठ्या व्यक्तींमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसान भयंकर हाणामारीत झाले. सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांना आडवे पाडून कोयत्याने वार करण्यात आले. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहियानगर भागात शनिवारी रात्री ही घटना घडली.

खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 38 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

सलीम मुनीर शेख(46), अजिम सलीम शेख(21), अदनान सलीम शेख(20) यांना अटक करण्यात आली आहे. यातील अजिम शेख हा सराईत गुन्हेगार आहे. तर या घटनेत मुस्ताक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलाची यातील अल्पवयीन मुलाबरोबर वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन फिर्यादीच्या पुतण्याच्या दुकानात सर्व आरोपी जाब विचारण्यास आले. तेथे त्यांच्या पुतण्याला शिवगाळ करण्यात येत होती. यावेळी फिर्यादीचा पती मुस्ताक शेख हा तेथे दाखल झाला. त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या डोक्‍यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार त्याने हातावर घेतला. यानंतर मुस्ताकला रस्त्यावर आडवे पाडून कोयत्याने डोक्‍यावर आणी छातीवर सपासप वार केले. इतर आरोपींनी लाथा-बुक्‍यांनी मारहाण केली.

फिर्यादीचा पुतण्या मोईसच्याही हातावर आणि कमरेवर कोयत्याने वार करण्यात आले. मोईसचा मित्र अल्पेश हा भांडणे सोडविण्याकरीता आला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक माने करत आहेत.

यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले, लहान मुलांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. घटनेनंतर तिघा आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.