Pune : सोशल मिडीयावर महिलेची बदनामी करत तिच्या मृत्यूची अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने व्हॉटसअप व इनस्टाग्रामवर (Pune) पीडितेची बदनामी करत तिच्या मृत्यूची अफवा पसरवल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना 31 जानेवारी 2023 ते 23 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली.

 

याप्रकरणी बुधवारी (दि.24) पीडितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चेतन रोहीत सिंग (रा. विश्रांतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : मित्राचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला अखेर साताऱ्यातून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या विषयी व्हॉटसअप व इन्स्टाग्रामवर अश्लिल कंमेट करत त्यांची बदनामी केली. तसेच इन्स्टाग्रामवर पीडितेचा फोटो टाकून त्याला श्रद्धांजली वाहत अफवा पसरवली. तसेच पीडितेला धमकी दिल्या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.