Pune Crime : पुण्यात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज : खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून पुण्यात सहकार विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा (Pune Crime) प्रकार उघडकीस आला आहे. गणेश शंकर शिंदे असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सहकार विभागात ते अधिकारी पदावर काम करत होते. परासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात. 
शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर गणेश साळुंखे, मनीषा हजारे यांच्यासह एका अनोळखी इसमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गणेश शिंदे (Pune Crime) हे सहकार विभागात लेखाधिकारी होते. त्यांना मुंबईहून पुण्याला बदली पाहिजे होती. यासाठी अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गणेश शिंदे यांनी खाजगी सावकारांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज दिल्यानंतरही सावकार त्यांच्या मागे पैशासाठी तगादा लावत होते. याच तगाद्याला वैतागून गणेश शिंदे यांनी आत्महत्या केली. फरासखाना पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.