Pune Crime : खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तडीपारास साथीदारांसह अटक

एमपीसी न्यूज : जुन्या भांडणाच्या (Pune Crime) रागातून एकाचा खूनाचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडाला त्याच्या साथीदारांसह अटक कऱण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने केली.

सुधिर चंद्रकांत गवस (वय 23 रा.येरवडा) व रुपेश दिलीप अडागळे (वय 24 रा. येरवडा) अशी अटक आरोपींची नावे असून एका विधीसंघर्षीत बालकालाही ताब्यात घेण्यात आले. गवस याच्यावर मारहाणीचे व चोरीचे गुन्हे दाखल असल्याने येरवडा पोलिसांनी त्याला दोन वर्षाकरीता तडीपार केले होते.

Rotary Club : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी तर्फे विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून गवस (Pune Crime) याने त्याचे साथीदार रुपेश अडागळे व अल्पवयीन मुलगा यांच्या साथीने एका तरुणाला डोक्यात कोयत्याने वार करून दगडाने व काठीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याच्या मागावर पोलीस होतीच. यावेळी युनीट चारच्या तपासी पथकाला गवस हा त्याच्या साथीदारांसह दोडामार्गे गोव्याला पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसानी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. यावरून येरवडा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे व तडीपार असतानाही शहरात प्रवेश करणे असे गुन्हे आरोपीवर दाखल कऱण्यात आले असून येरवडा पोलीस पुढिल तपास करत आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदिप पाटील व पोलीस अमंलदार महेंद्र पवार, हरिष मोरे, नागेश कुंवर, सारस साळवी, विठ्ठल वाव्हाळ, प्रविण भालचिंम, रमेश राठेड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.