Pune Crime : मित्राला बाहेर घेऊन जाण्यास बहिणीने विरोध केला म्हणून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – जेवण करत असताना ताटावरून तरुणाला मित्र घेऊन जात असताना त्यांच्या बहिणीने त्यांना विरोध केला त्यानंतर मित्राने त्याला सिमेंटच्या ब्लॉक डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हि घटना रविवारी (दि.8) मुंढवा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आकाश चंद्रकांत महापुरे (वय 19, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, दिनेश गायकवाड (वय 28) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत दिनेशची आई अंजली गायकवाड (वय 66) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेजारी राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी आरोपी आकाश हा फिर्यादीच्या घरी आला. तसेच दिनेश याला बाहेर जायचे म्हणून घेऊन निघाला. यावेळी दिनेश जेवण करत होता. तो जेवत्या ताटावरून उठला आणि त्याच्यासोबत निघाला.

यावेळी दिनेश याच्या बहिणीने अरे भिकाऱ्यासारखा कुठे जातोय असे म्हणून त्याला हटकले. याचा आरोपी आकाश याला राग आला. त्याने दिनेशच्या बहिणीशी वाद घातला आणि हा माझ्या भावा सारखा आहे, असे म्हणून त्याला नेले.

त्यानंतर त्याने बाहेर नेऊन तुझी बहीण आम्हाला भिकारी म्हणली म्हणत वाद घातला. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात दिनेश हा गंभीर जखमी झाला आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.