Pune Crime : बहिणीसोबत संपर्कात असल्याचा राग मनात ठेवून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – बहिणीसोबत संपर्कात असल्याचा राग मनात ठेवून तरुणाला धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शनिवारी (दि.14) रात्री साडे अकराच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरात हि घटना घडली.

ऋतीक राजेश घाडगे (वय 19, रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी तरुणाचा भाऊ रतन औसरमल (वय 24, रा. कोरेगाव पार्क, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ आकाश अशोक औसरमल (वय 22) हा मित्रांसोबत बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी ऋतीक घाडगे याने आकाश बहिणीच्या संपर्कात असल्याचा राग मनात धरून त्याच्यावर लोखंडी हात्याराने गंभीर वार केले. तसेच सोबत असलेल्या आकाशच्या मित्रांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.