Pune Crime : चोरीच्या मोबाईलची माहिती देण्यास घरी आलेल्या दोघांचा तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – चोरीचा मोबाईल असल्याची माहिती देण्यास घरी आलेल्या दोघांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी सूरज कामथे (वय 29, रा. धनकवडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौरभ राजू भगत (वय 21, रा. मोरे वस्ती, सहकारनगर) व अजय जवाहर प्रजापती (वय 20, सुखसागरनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज कामथे हा रिक्षाचालक असून आरोपी सौरभ व अजय एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपुर्वी सूरजने सौरभला त्याचे सीमकार्ड दिले होते. सौरभने एक दिवस सीमकार्ड वापरून पुन्हा सूरजला दिले. त्यानंतर राजगड पोलिसांनी सूरजला फोन करुन सीम कार्ड टाकलेला मोबाईल चोरीचा असल्याची माहिती दिली. तो मोबाईल पोलीस ठाण्यात जमा करण्याचे सांगितले. त्यामुळे ही माहिती सांगण्यासाठी सूरज सौरभच्या घरी गेला.

त्याचा राग आल्याने सौरभ आणि अजयने सूरजवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्याशिवाय हातात चाकू घेउन परिसरात दहशत माजविली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद करुन पळ काढला. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.