Pune Crime : जुन्या भांडणाच्या रागातून शेजाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – पंधरा दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन शेजारी राहणा-या कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न चौघांनी केला आहे. हि घटना शनिवारी (दि.7) रात्री अकराच्या सुमारास लोहियानगर येथे घडली. दरम्यान, या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

सलीम मुनीर शेख (वय 46), अजीम सलीम शेख (वय 21), अदनान सलीम शेख (वय 20) या तिघीनांही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आणखी एक विधिसंघर्षित बालक आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी आणि फिर्यादी हे शेजारी आहेत. पंधरा दिवसांपूर्वी फिर्यादी यांचा मुलगा झैद याच्याशी आरोपी यांचा वाद झाला होता. या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांचा पुतण्या मोईस शेख याच्याशी आरोपी यांनी वाद घालण्यास सुरवात केली.

हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांचे पती मुश्ताक शेख यांच्यावर आरोपीनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच मोईस शेख याच्यावर देखील गंभीर वार करुन त्याला जखमी केले. याठिकाणी आलेल्या मोईसच्या मित्राला देखील तू इथं का आलास म्हणून मारहाण केली. खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III