Pune: मार्केटयार्ड परिसरात 27 लाखांची अप्रमाणित सॅनिटायझर्स जप्त, सहाजणांना अटक

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नफेखोरीसाठी बाजारात अप्रमाणित सॅनिटायझर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट -5 ने केलेल्या कारवाईत सहा उत्पादक व विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या सुमारे 27 लाख रुपये किंमतीची अप्रमाणित सॅनिटाझर्स जप्त करण्यात आली. 

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा आरोपींना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. कोणत्याही प्रकारचा उत्पादनाचा परवाना नसताना हे आरोपी सॅनिटायझर्स बनवून त्यावर ‘मेड इन नेपाळ’, ‘मेड इन तैवान’ अशी लेबल लावून त्याची सर्रास विक्री करीत होती. त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे अधिकारी पुढील तपास करीत आहे. बनावट औषधी उत्पादने हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ असून तो थांबविण्यासाठी बनावट उत्पादनांच्या विक्रीसंदर्भातील माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.