Pune Crime : दहा एकर जागेच्या वादातून ‘त्या’ बिल्डरच्या खुनाची सुपारी

एमपीसी न्यूज – बिल्डर राजेश कानाबार यांचा सोमवारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळ्या घालून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात  बावधन येथील दहा एकर जागेच्या वादातून हा खून करण्यात आला.  तसेच यासाठी दहा लाखांची सुपारी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गोळ्या झाडणारा आरोपी हसमुख पटेल यासह राहुल कांबळे, रुपेश कांबळे आणि गणेश गुर्हे या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्वास गंगावणे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजेश कानाबार हे बांधकाम व्यावसायिक असून इमारत सुशोभीकरणाचे करण्याची कामे ते करत. दहा एकर जागेवरून त्यांचे काही व्यक्तींशी वाद सुरू होते. त्यात जागेवरील सुनावणीसाठी ते घटनेच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. सुनावणी संपल्यानंतर परत जाण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.