Pune Crime : डेक्कनमध्ये घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्याशिवाय एका ब्युटी पार्लरमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास डेक्कनमधील गणेशवाडीतील शुभायन अपार्टमेंटमध्ये घडली.

याबाबत अमित गुप्ता (वय 43 ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अमित शुभायन सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी ते कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून 1 लाख 20  हजारांचा ऐवज चोरून नेला.

चोरट्यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या आय टू कॅन ब्यूटी पार्लरमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब झरेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.