Pune Crime : शहरातील घरफोड्याचे सत्र सुरूच, कर्वेनगर आणि हडपसरमधून 13 लाखाचा ऐवज लंपास

0

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरू असणाऱ्या घरफोड्या काही थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. चोरट्यांनी कर्वेनगर आणि हडपसर मधील घरांच्या खिडकीचे गज कापून तब्बल 13 लाखांचा ऐवज चोरून नेला.

हडपसर परिसरातील भेकराईनगर येथील एका घरातून लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले 1 लाख 57 हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी नागनाथ सुतार (वय 58 ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुतार भेकराईनगरमधील संतकृपा निवास इमारतीत राहायला आहेत. लक्ष्मीपूजनाला त्यांनी देवघरात दागिन्यांची पूजा केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. भाबड तपास करीत आहेत.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुस-या घटनेत चोरट्यांनी खिडकीचे गज उचकटून तब्बल 11 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये सोन्याचे, हिऱ्याचे दागिने, 150 अमेरिकन डॉलरचा समावेश होता. याप्रकरणी अतुल मीनू नारखेडे (वय 49, रा. कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कर्वेनगरमधील अलंकार कॉलनीतील बंगल्यात राहायला आहेत. 19 ते 20 नोव्हेंबरला ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या खिडकीचे गज कापून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील सोन्याचे दागिने आणि अमेरिकन डॉलर असा 11 लाख 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून परत आल्यानंतर अतुल यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III