Pune Crime : पोलिसांची ओळख दाखवत व्याज वसुलीसाठी सावकाराकडून ठार मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : तीस हजाराच्या बदल्यात चाळीस हजार (Pune Crime) रुपये दिले, तरीही आणखी व्याजाची मागणी करत ठार मारण्याची धमकी देणाऱ्या एका खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विजय आल्हाट (वय 25, सिद्धार्थ नगर, धानोरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीने आरोपी अक्षय आल्हाट यांच्याकडून 15 टक्के व्याजदर आणि 30 हजार रुपये घेतले होते. त्यासाठी स्वतःची दुचाकी गहाण ठेवली होती. त्यानंतर फिर्यादीने व्याजापोटी 40 हजार रुपये रोख दिले असता आणखी 30 हजार रुपयाची मागणी आरोपीने त्याच्याकडे केली. हे पैसे न दिल्यास खराडीतून उचलून घेऊन जाईल आणि ठार मारेन अशी धमकी त्याला आरोपीने दिली.

Pune : आजीची चैन चोरणाऱ्या चोरट्याला 10 वर्षीय मुलीने दाखवला इंगा..

पोलीस माझ्या ओळखीचे आहेत तुला सोडणार नाही असे बोलून घरी येऊन फिर्यादीच्या (Pune Crime) आई वडिलांना देखील या खाजगी सावकाराने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मात्र फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.