Pune Crime : बिअर शॉपमध्ये पाच रुपयावरून वाद; ग्राहकाची पिक-अप गाडी फोडली

एमपीसी न्यूज – बिअर शॉपमध्ये बियर विकत घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाकडे पाच रुपये कमी होते. यावरून ग्राहक आणि दुकान मालकात झालेल्या वादानंतर ग्राहकाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याची महिंद्रा पिक अप गाडीही फोडण्यात आली. हा संपूर्ण प्रकार रविवारी सायंकाळी उरुळी देवाची गावांमध्ये घडला.

याप्रकरणी प्रवीण संजय कामठे (वय 28) या तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून बिअर शॉपचा मालक सोन्या आणि त्याच्या 3 ते चार साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची या गावात जस्ट एन्जॉय बिअर शॉप या नावाचे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी फिर्यादी तरुण या दुकानांमध्ये बियर विकत घेण्यासाठी गेला होता. परंतु त्याच्याकडे पाच रुपये कमी होते. यावरून दुकान मालकासोबत त्याचा वाद झाला.

दुकान मालक सोन्याने शेजारच्या चायनीज सेंटर मधील तीन ते चार लोकांना बोलावून फिर्यादीला बेदम मारहाण केली. दरम्यान मारहाण होत असल्याने फिर्यादी यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांची बाहेर उभी असणारी महिंद्रा पिक अप गाडी आरोपींनी फोडून टाकली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.