Pune Crime : लोणी काळभोर परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारा जेरबंद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील टोल नाक्याजवळ अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईतील एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

त्याच्या ताब्यातून 6 ग्रॅम 850 मिली वजनाचे 54800 रु किंमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अशोक किट्टू पुजारी (वय 47) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

एका फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना मुंबईतील एक व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत अशोक पुजारी असे त्याचे नाव होते तर त्याच्या अंगझडती पोलिसांना मेफेड्रोन नावाचा अंमली पदार्थ सापडला.

पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क) 22(अ) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.