Pune Crime : बनावट फायनान्स कंपनी उघडून 27 जणांची केली आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट कंपनी उघडून 2 लाख रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने 3 लाख 77 हजार रुपये गोळा करून 27 नागरिकांची फसवणूक केली आहे. ऑगस्ट 2020 पासून आतापर्यंत त्याने ऑफिस उघडून लोकांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी राजू थोरात (वय 51) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वराज जयदेव देवर (वय 35, रा. कडनगर, उंड्री) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सिक्रेट हार्ट टाऊन येथील मॅक्डोलॅन्डच्या दुसऱ्या मजल्यावर ‘देवर फायनान्स’ नावाने ऑफिस सुरू केले. कोणत्याही बँकेचा अधिकृत परवाना नसताना तसेच तो बँकेचा अधिकारी नसताना त्याने फिर्यादी थोरात यांच्या पत्नीला 2 लाख रुपयांचे लोन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यांच्याकडून काही खर्च म्हणून 13 हजार घेतले. तर त्यांच्यासोबत इतर 27 जणांना देखील त्याने अश्याच प्रकारे माहिती सांगून प्रत्येकाकडून 13 हजार असे एकूण 3 लाख 77 हजार रुपये घेतले. मात्र त्यातील एकालाही लोन न देता तो पसार झाला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.