Pune Crime : पोलीस आयुक्तालयाजवळ बिल्डरवर गोळ्या झाडणाऱ्या चौघांना अटक, ‘या’ कारणावरून केला खून

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बांधकाम व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

राजेश हरीदास कानाबार (वय 63) खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी यातील गोळी झाडणाऱ्यासह सर्व आरोपींना अटक केली आहे.

गोळ्या झाडणारा हसमुख पटेल यासह राहुल कांबळे, रुपेश कांबळे आणि गणेश गुर्हे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विश्वास गंगावणे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कानाबार हे बांधकाम व्यावसायिक असून इमारत सुशोभीकरणाची कामे ते करतात. बाणेर येथील एका जागेवरून त्यांचे काही व्यक्तींशी वाद सुरू होते. त्यात जागेवरील सुनावणीसाठी ते घटनेच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. सुनावणी संपल्यानंतर परत जाण्यासाठी निघाले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.