Pune Crime : दारू पिण्याच्या वादातून मित्राचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज : दारू पिताना झालेल्या (Pune Crime) वादातून एकाने मित्राचा खून केल्याची घटना घडली. पुण्यातील हडपसर परिसरातील वैदवाडी येथील कॅनलजवळ हा सर्व प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 ऑगस्ट रोजी घडला आहे. अनिल राजू सासी (वय 33) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Pune Rain : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता

प्रवीण नामदेव नाईक (वय 41) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मयत तरुणाचा भाऊ अक्षय राजू सासी (वय 25) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मयत अनिल आणि आरोपी प्रवीण हे दारू पीत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने अनिल याच्या डोळ्याच्या बाजूला व कपाळावर दगडाने मारून त्याला गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी झालेल्या अनिल याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचार सुरू असताना 7 ऑगस्ट रोजी अनिल सासी याचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.