Pune Crime : बनावट दागिन्यांसह महिलांना टार्गेट करणाऱ्या टोळीला अटक

एमपीसी न्यूज : बनावट दागिन्यांसह वृद्ध आणि महिलांना टार्गेट (Pune Crime) करणाऱ्या एका टोळीला पुणे शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गणेश विनायक गायकवाड, रमेश विनायक गायकवाड, बंडू लक्ष्मण जाधव, हरिभाऊ मोहन कासुळे, महादेव आसाराम जाधव अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, “महिला प्रवाशांना आमिष दाखवण्यासाठी ही टोळी सोन्याच्या बिस्किटांसारखे बनावट दागिने रस्त्यावर फेकत असे. महिलांनी बनावट दागिने उचलले की टोळीचे सदस्य त्यांच्याकडे जाऊन बनावट सोने त्यांच्यासोबत वाटून घेण्यास सांगत. नंतर महिलांना सांगायचे, की हे सोने एका जाड बंदिस्तात आहे जे तोडता येत नाही आणि खोट्या सोन्याच्या बदल्यात स्वतःचे सोन्याचे दागिने द्यायला सांगायचे.

Wakad : मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत ठेवले शारीरिक संबंध; गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस

त्यांच्याविरुद्ध हडपसर येथे सात, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन आणि भोसरी (Pune Crime) पोलिस ठाण्यात (पिंपरी चिंचवड पोलिस) एक गुन्हे दाखल आहेत. टोळीच्या सदस्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने अटक करण्यात यश मिळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.