Pune Crime : उच्चशिक्षित तरुणाकडून मुलीसह तिच्या कुटुंबीयांची सोशल मीडियावर बदनामी

एमपीसी न्यूज – ठरलेले लग्न मोडल्याच्या रागातून एका उच्चशिक्षित तरुणानाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणाने सोशल मीडियावर बनावट खाती उघडून संबंधीत तरुणीच्या नातेवाईक व मित्र मंडळींना त्रास दिला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आय टी अक्टनुसार गुन्हा दाखल करत त्या तरूणाला अटक करण्यात आली आहे. आदेश अशोक बोरा (रा. यशोदीप सोसायटी, गोकुळनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बोरा हा उच्चशिक्षित असून परदेशात नोकरी करतो. त्याचा तक्रारदार तरुणीबरोबर विवाह ठरला होता. त्यांचा साखरपुडाही झाली होता. मात्र काही कारणामुळे हा विवाह मोडला. बोरा हा परदेशातून विवाहासाठी पुण्यात रहात्या घरी आला होता. विवाह मोडल्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. यातूनच त्याने जी मेल, फेसबुक, इंन्स्टाग्राम, पिन्टरेस्ट आदी सोशल मीडियावर बनावट नावाने खाती उघडली. यानंतर या खात्यांच्या सहाय्याने तक्रारदार तरुणीच्या मित्र व नातेवाईकांना त्रास देण्यास सुरूवात केली.

दरम्यान हा प्रकार तक्रारदार यांना समजताच त्यांनी, पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आदेशला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. याप्रकरणाचा भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.