Pune Crime : हिशोबाच्या कारणावरून हॉटेल पार्टनरला मारहाण, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : हॉटेलमधील पैशाचा हिशोब लागत (Pune Crime) नसल्याच्या कारणावरून एकाने आपल्याच पार्टनरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. विश्रांतवाडीतील कीर्ती हॉटेलमध्ये 1 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी मिलिंद आनंद शेट्टी (वय 58) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचे पार्टनर प्रशांत पुजारी, हॉटेल मॅनेजर उमेश पुजारी आणि कॅशियर संतोष पुजारी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की विश्रांतवाडी चौकात कीर्ती हॉटेल आहे. मिलिंद शेट्टी आणि प्रशांत पुजारी हे दोघे या हॉटेलमध्ये पार्टनर आहेत. दरम्यान एक डिसेंबरच्या रात्री हॉटेलमधील हिशोबाच्या कारणावरून आरोपींनी मिलिंद शेट्टी यांना बेदम मारहाण केली. आरोपी संतोष पुजारी यांनी किचनमध्ये असणाऱ्या लोखंडी (Pune Crime) रॉडने फिर्यादी यांच्या डोळ्यावर छातीवर आणि हातावर मारहाण करून त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Chinchwad News : पथ विक्रेत्यांनी आपल्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री स्व-निधी योजनेचा लाभ घ्यावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.