Pune Crime फेसबुक मेसेंजरमध्ये शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – फेसबुक मेसेंजरमध्ये ‘कुत्ता’ अशी शिवी देत मेसेज केलेल्या रागातून पती-पत्नीला मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

25 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. किरण मारुती कुंजीर (वय 32) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून विलास भगवान कुंजीर, सोमनाथ विलास कुंजीर आणि सिंधुबाई विलास कुंजीर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी फिर्यादी पत्नीसह घराबाहेर बसले असताना आरोपी त्यांच्या घरासमोर आले. तू माझे फेसबुक मेसेंजरवर कुत्ता असा मेसेज का केला अशी विचारणा करीत त्यांना दगडाने आणि हाताने मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बंडगर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III