Pune Crime : शहरात राहण्यावरून पती-पत्नीत वाद, पत्नीने टोकाचे पाऊल उचलत दीड वर्षाच्या मुलीसह स्वतःलाही संपवले

एमपीसी न्यूज – गावाकडे न जाता शहरातच राहण्यावरून पती-पत्नीत झालेल्या वादानंतर पत्नीने टोकाची भूमिका घेत दीड वर्षाच्या मुलीचा खून करून स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. 

पतिने दिलेल्या फिर्यादीत नंतर मयत पत्नीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता अमित बागल (वय अंदाजे 26) आणि काव्य अमित बागल (वय 18 महिने) असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमित बागल यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित बागल हे खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे एका इमारतीत भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना सध्या नोकरी नसल्यामुळे गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांची पत्नी योगिता बागल यांना हे मान्य नव्हते. त्यांना शहरातच राहायचे होते यावरून दोघांमध्ये चार ऑक्टोबर रोजी भांडण झाले.

भांडणानंतर फिर्यादी हे आंबेगाव तालुक्यातील पेठ पारगाव या मुळगावी वडिलांना भेटण्यासाठी निघून गेले. त्यानंतर योगिता बागल यांनी राहत्या घरातच स्वतःच्या अठरा महिन्याच्या मुलीला गळफास देऊन तिचा खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.