रविवार, जानेवारी 29, 2023

Pune Crime : ‘संबंध ठेवले नाही तर ऍसिड फेकेन’, महाविद्यालयीन तरुणीला धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महाविद्यालयीन तरुणीला वारंवार (Pune Crime) फोन करून तिचा पाठलाग करत विनयभंग करून फिजीकल रिलेशन न ठेवल्यास अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, या तरुणाच्या कुटूंबाने देखील या तरुणीला धमकावले असून, तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात 20 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून एका तरुणासह त्याचा भाऊ व आईवर गुन्हा नोंद केला आहे.

तरुणी व तरुण एकमेकांच्या ओळखीतील असून, त्यांचे मैत्रिपुर्ण संबंध होते. पण, त्यानतंर तरुणीने मैत्रीचे संबंध सोडले. त्यानंतर तरुणाने तिला फोन करून व पाठलाग करून त्रास देण्यास सुरूवात केली. तर, भर रस्त्यात तिला अडवून अश्लील चाळे केले. तसेच, तिला फिजीकल रिलेशन (Pune Crime) न ठेवल्यास अॅसिड फेकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune Crime : बिल्डरचे खाजगी फोटो व्हायरल न करण्यासाठी 8.3 कोटी रुपयांची मागणी

Latest news
Related news