मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune Crime : रस्त्यात दुचाकी अडवून तरुणी सोबत लग्नाचा आग्रह, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पुण्यातील मंगळवार पेठेत (Pune Crime) एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीची दुचाकी आणून तिला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर बोपदेव घाटात घेऊन जात लग्न करण्याचा आग्रह धरला. लग्न न केल्यास या तरुणाने स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीक्षांत प्रशांत वाघमारे (वय 22) मंगळवार पेठ, भीम नगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. 22 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 25 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या दुचाकीने ऑफिसला जात असताना आरोपीने आपली दुचाकी रस्त्यात आडवी लावून या तरुणीला थांबवले. त्यानंतर या तरुणीचा पाठलाग करून ऑफिसजवळ जबरदस्तीने या तरुणीला आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिर येथे या तरुणीला तो घेऊन गेला. या तरुणीच्या इच्छा नसतानाही त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा आग्रह धरला. परंतु, फिर्यादीने त्याला नकार दिला तेव्हा त्याने (Pune Crime) स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime : हिशोबाच्या कारणावरून हॉटेल पार्टनरला मारहाण, गुन्हा दाखल

Latest news
Related news