Pune Crime : आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी (Pune Crime) रात्री खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2023 क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना वेगवेगळ्या राज्यातील सहा बुकींना अटक केली.

गौरव धरमवानी (वय 26), सुनील लखवानी (वय 26) आणि छत्तीसगडमधील रायपूर येथील जपजीतसिंग बग्गा, जसप्रीत सिंग (वय 29) आणि पंजाबमधील लुधियाना येथील तरनदीप सिंग (वय 33) आणि दरभंगा येथील लाल किशोर राम (वय 37) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Chinchwad : चिंचवड येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक

या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. गुप्त माहितीवरून पुणे शहर पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी रात्री खराडी येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकला.

पोलिसांनी सहा जणांना घटनास्थळी अटक केली तसेच 16 सेल फोन, दोन लॅपटॉप, एक वायफाय राउटर (Pune Crime) आणि इतर वस्तू असे मिळून एकूण 4.8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.