Pune Crime : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने चाकूने गळ्यावर केले वार

एमपीसी न्यूज – दारु पिण्यासाठी पन्नास रुपये न दिल्याने एकावर चाकूने गळ्यावर वार केले आहेत. हि घटना शनिवारी (दि.31) येरवडा परिसरात घडली.

याप्रकरणी सपना डोंगरे (वय 33, रा. भाजी मार्केट, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांताराम धोंडीबा पवार (वय 50, रा. भाजी मार्केट, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी शांताराम पवार याने फिर्यादी यांचे पती राजू डोंगरे यांच्याकडे दारु पिण्यासाठी पन्नास रुपयांची मागणी केली. डोंगरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने राग आलेल्या आरोपीने त्यांना चाकूने गळ्यावर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले. दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.