Pune Crime : दुचाकी चोरांचे मोठे रॅकेट उघडकीस, 27 दुचाकी हस्तगत, पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज – हडपसर पोलिसांनी दुचाकी चोरीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 19 लाखाच्या तब्बल 27 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

कार्तिक प्रकाश भुजबळ, योगेश नवनाथ वजाळे उर्फ टकल्या, अभिषेक अनिल भडंगे, निलेश मधुकर आरते आणि संजय हरीश भोसले उर्फ सोन्या अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी शेवाळवाडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना दुचाकीवर संशयास्पद अवस्थेत दोन व्यक्ती दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. पोलिसांनीही दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरु करत काही अंतरावर दोघांनाही पकडले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नावे कार्तिक, योगेश आणि अभिषेक असल्याचे सांगितले. त्यांनी आठ लाख 20 हजार रुपयांच्या 15 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

तर दुसऱ्या एका घटनेत हडपसर पोलिसांनी दोघा सराईताचा फिल्मी स्टाइल पाठलाग करत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांनी 9 लाख 10 हजारांच्या 10 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.