Pune Crime : कुत्र्याला दगड मारला म्हणून शेजाऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला

एमपीसी न्यूज : कुत्र्याला दगड मारल्याने (Pune Crime) शेजाऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे. पुण्यातील बाणेर येथील शिंदेमळा परिसरातील कपिल मल्हार सोसायटीजवळ रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली.

रवी घोरपडे यांच्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अयुब बाशा शेख (36, रा. बाणेर) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखचा पाळीव (Pune Crime) कुत्रा घोरपडे यांच्यावर भुंकला आणि त्यानंतर त्याने कुत्र्यावर दगड मारला. यावरून त्यांच्यात वाद होऊन शेख याने घोरपडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर पोलिसांनी शेखला अटक केली. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Today’s Horoscope 05 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.