Pune Crime : किरकोळ कारणावरून डोक्यात फावडे मारून मित्राचा खून

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून डोक्यात फावडे मारून एकाचा खून करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील तुळापूर गावच्या हद्दीत हा प्रकार घडला. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. राजेंद्र नासकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी रोबिन शोयलिन सदार याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सुरेश प्रतापराव शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोपी पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. फिर्यादी यांच्या शेतात ते मोलमजुरीची कामे करतात आणि शेतातच राहतात. शनिवारी सायंकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आरोपीने शेजारी पडलेले फावडे उचलून नासकर याच्या डोक्यात मारले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.