Pune Crime : गटारात सापडलेल्या ‘त्या’ महिलेच्या खुनाचे गूढ उकलले, चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केला खून

एमपीसी न्यूज – शिक्रापूर परिसरातील वेळ नदी पात्रात 9 नोव्हेंबर रोजी पाईपलाईनचे काम सुरू असताना गटारात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेच्या दोन्ही हाताच्या शिरा कापलेल्या होत्या आणि गळा तारेने गुंडाळला होता. या महिलेची ओळख पटली असून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयातून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

महिलेचा पती फिरोज हबीब शेख (रा. कंधार नांदेड) आणि फयूम शेख (रा. लोहा, नांदेड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतचे कर्मचारी गटार पाईपलाईनचे काम करीत असताना त्यांना हा मृतदेह सापडला होता. णकरण्यात आला होता. तपासादरम्यान ही महिला शिक्रापूर परिसरातील कुंभारवाडा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी कुंभारवाडी परिसरात जाऊन पाहणी केली विचारणा केली असता सदर महिला गायब असून तिचा पती दोन दिवसांपूर्वीच गावाकडे गेला असल्याचे कळाले. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांच्या एका पथकाने नांदेड येथे जाऊन या महिलेचा पती फिरोज हबीब शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली.

आरोपीने काही वर्षांपूर्वी सदर महिलेसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र या महिलेचे मुळगाव, तिचे खरे नाव याविषयी त्याला काहीही माहिती नव्हती. महिलेच्या दोन मुलांसह होते शिक्रापूर येथे राहत होते. पण त्याला मागील काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय येत होता. या संशयातूनच आरोपीने नातेवाईक असलेल्या फयूम शेख याच्या मदतीने पत्नीचा खून केला मृतदेह वेळ नदीपात्रातील गटारात आणून फेकला. त्यानंतर दोघेही दुचाकीने नांदेडला निघून गेले.

या घटनेत कुठलेही पुरावे मागे नसताना पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्वक तपास करत आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.