Pune Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहित महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील दत्तवाडी परिसरात (Pune Crime) राहणार्‍या 21 वर्षीय नवविवाहित महिलेने पती आणि सासूच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

रुकय्या शहानवाज शेख (वय 21) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. तर, पती शहानवाज कासीम शेख आणि सासू राजमा कासीम शेख असे आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुकय्या शहानवाज शेख, पती शहानवाज कासीम शेख आणि सासू राजमा कासीम शेख हे तिघे जनता वसाहत येथील गल्ली क्रमांक 93 मध्ये राहत होते. रुकय्या शहानवाज शेख आणि शहानवाज कासीम शेख या दोघांचा 20 मे 2022 रोजी विवाह झाला होता.

Mulshi : छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ पिरंगूटमध्ये हजारहून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

तेव्हापासून 18 मार्च 2023 पर्यंत रुकय्या यांना पती आणि सासूकडून लग्नामध्ये हुंडा दिला नाही, तुला काही काम येत नाही अशा शब्दात सतत टोमणे मारले जात होते. या मानसिक त्रासाला कंटाळून (Pune Crime) रुकय्या शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या प्रकरणी मयत रुकय्या यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासू विरोधात दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती शहानवाज कासीम शेख याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.