Pune Crime News : वारजेत पोलीस उपनिरीक्षकाच्या आईचा खून, आरोपीला सहा तासात बेड्या

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील वारजे परिसरात एका अनोळखी व्यक्तीने शहाबाई अरुण शेलार (वय 65) या महिलेचा खून केला होता. मृत महिला ही एका पोलीस उपनिरीक्षकाची आई होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत अवघ्या सहा तासात आरोपीला अटक केली आहे. अफसर असलम अली (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तू मूळचा उत्तर प्रदेशातील असून उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना संगमवाडी येथील पार्किंग मधून त्याला ताब्यात घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वारजे माळवाडी परिसरात शहाबाई शेलार यांचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा खून अफसर अली नामक व्यक्तीने केला असून तो ट्रॅव्हल्सने उत्तर प्रदेश राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पुण्यातील संगमवाडी परिसरातून अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता चोरीच्या उद्देशाने त्याने हा खून केल्याची कबुली दिली. आरोपी चोरी करण्यासाठी घरात घुसला त्यानंतर शहाबाई यांच्यासोबत त्यांची झटापट झाली. यातूनच त्याने महिलेच्या डोक्यात रॉड टाकला असावा असा अंदाज आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.