Cyber Crime News : गिफ्टच्या बहाण्याने जेष्ठ महिलेला 13 लाखांचा गंडा

एमपीसीन्यूज : फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी महिलेसह एकासोबत झालेल्या ओळखीचा जेष्ठ महिलेला फटका बसला आहे. गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला 13 लाख 17 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला.

ही घटना जानेवारी ते जून 2020 कालावधीत घडली. याप्रकरणी 61 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. जानेवारी 2020 मध्ये त्यांनी फेसबुकवर एका महिलेसोबत ओळख झाली. त्यानंतर संबंधित महिलेने जेष्ठ महिलेसोबत ओळख वाढवून विश्वास संपादित केला. त्यानंतर गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेसह एकाने जेष्ठ महिलेला 13 लाख 17 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.