Pune Crime News : पुण्यातील ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर 13 जण सलग दोन दिवस करत होते अत्याचार

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण करण्यात आलेल्या त्या 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस 13 जण बलात्कार करत असल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी या मुलीच्या मित्रासह 14 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. आरोपींपैकी बारा जण हे विवाहित असून त्यांना मुलेदेखील असल्याची माहिती आता समोर आली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत मशाक अब्दुलमजीद कान्याल (वय 27, रा. हडपसर), अकबर उमर शेख (वय 32, रा. जुना बाजार), रफिक मुर्तजा शेख (वय 32), अझरूद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय 27), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय 32), राजकुमार रामनगिना प्रसाद (वय 29), नोईब नईम खान (वय 24), असिफ फिरोज पठाण (वय 36), मिराअली उर्फ मिरा अजीज शेख (वय 26, मंगळवार पेठ), शाहुजर उर्फ सिराज साहेबलाल छप्परचंद (वय 28, रा. कोंढवा), समीर मेहबुब शेख (वय 19, रा. कोंढवा खुर्द), फिरोज उर्फ शाहरूख साहेबलाल शेख (वय 22, रा. कोंढवा), महबुब उर्फ गौस सत्तार शेख (वय 23, रा. कोंढवा खुर्द), मोहम्मद उर्फ गोलु मोज्जाम आलम (वय 19, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

14 वर्षे वयाची ही मुलगी 31 ऑगस्ट रोजी मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात गेली होती. यादरम्यान आरोपींनी तिला रात्र झाली असून घरी सोडण्याचा बहाणा करत रिक्षात बसून तिचे अपहरण केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी पीडित मुलीवर जंगलात, निर्जनस्थळी, रिक्षामध्ये, लॉज मध्ये आणि रेल्वेच्या कार्यालयात घेऊन जात बलात्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.