Pune Crime News : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेसह 14 जणांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

एमपीसीन्यूज – नागरिकांना दमदाटी करून मालमत्ता हडप केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेसह 14 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सुमंत रंगनाथ देठे (वय 58) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी आणि अनु़सूचित जाती व अनु़सूचित जमाती कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बर्‍हाटे, कथीत पत्रकार देवेंद्र जैन, शैलेश जगताप, विशाल ढोरे, विनोद ढोरे, अस्लम पठाण, सुजितसिंह, बालाजी लोखंडे, सचिन धीवार, विठ्ठल रेड्डी, परवेश जमादार, गणेश आमंदे, नितीन पवार अशा 14 जणांच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

बर्‍हाटेवर आत्तापर्यंत पुणे शहर, पुणे ग्रामीणमध्ये 14 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. देवेंद्र जैन याच्यासह इतरांवर देखील शहरातील विविध भागात 8 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये फसवणूक करणे, खंडणी, आर्म अ‍ॅक्टसह गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याची घोषणा केल्यानंतर आठच दिवसात बर्‍हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1