Pune Crime News : कात्रज चौकातून 17 किलो अफू तर वारजेतून एलएसडी जप्त, चार जण ताब्यात

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलिसांनी एका होंडा सिटी कार चालकास अटक करुन 17 किलो 200 ग्रॅम अफु हा अंमलीपदार्थ जप्त केला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिपाल गणपत विष्णोई(30,रा.हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील पोलीस नाईक वणवे व पोलीस शिपाई पांढरे यांना कात्रज चौकात एक एक संशयास्पद होंडा सिटी कार अडवली. त्यांनी गाडीच्या डिकीची तपासणी केली असता, त्यांना डिक्कीमध्ये अफुची बोंडे व पाने आढळली. त्यांनी तातडीने याची खबर भारती विद्यापीठ पोलिसांना दिली.

गुन्हे शाखेकडू एलएसडी हस्तगत
अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना तीघांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून एलएसडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश सोहनलाल चौधरी ( 19, रा.तुकाराम कमान, शास्त्रीनगर कोथरूड) , शुभम विलास काशाळे ( 23 रा 395 दुर्वांकुर हॉटेल समोर स्वरांजली अपार्टमेंट टिळक रोड ), यशवंत चारुदत्त सोनवणे (20 रा 61 सदाशिव पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. हे तीघेही वारजे माळवाडीतील काकडे सीटीजवळ एलएसडी हा अमली पदार्थ अवैधरित्या बाळगून विक्री करताना सापडले. त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे एलएसडी हा अमली पदार्थ 380 मिली ग्राम (किमत 40,000) व त्यांच्याकडील मोबाईल एकूण किमत 40,000/-रु असा एकूण 80,000/-रु चा मुद्देमाल मिळून आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.